गावा विषयी माहिती

      मांजरसुंबा हे महाराष्ट्रातील अहिल्यानगर जिल्ह्यातील नगर तालुक्याच्या हृदय स्थानी वसलेले एक सुंदर आणि शांततामय तसेच आदर्श गाव तसेच स्मार्ट व्हिलेज म्हणून ओळखले जात आहे. या गावचे वैशिष्ट्य म्हणजे ते एक पर्यटन स्थळ व ऐतिहासिक स्थळ म्हणून देखील ओळखले जाते. निसर्गाने समृद्ध असून तसेच नाथ संप्रदायातील गुरु गोरक्षनाथ यांच्या पदस्पर्शाने पावन झालेले एक धार्मिक स्थळ आहे. गावचे सर्वात मोठे आराध्य दैवत म्हणून ओळखले जात आहे. हिरवळ पाण्याचे नैसर्गिक स्रोत आणि नैसर्गिक सौंदर्य येथे सहज पाहायला मिळते.

      मांजरसुंबा गावची संस्कृती पारंपारिक मराठी जीवनशैलीवर आधारित आहे जिथे सण उत्सव आणि सामाजिक कार्यक्रम मोठ्या आनंदाने साजरे केले जातात. गावातील लोक मुख्यत्वे कृषी संबंधित उपक्रम मध्ये गुंतलेले आहे. शेतीसह विविध लहान उद्योग आणि हस्तकला या भागातील लोकांच्या जीवनाचा भाग आहे. गावात एकजुटीची भावना स्पष्टपणे जाणवते आणि समुदायातील लोक एकमेकांच्या मदतीसाठी सदैव तयार असतात. मांजरसुंबा मध्ये शिक्षणावरती ही भर दिला जातो. झेडपी स्कूल मांजरसुंबा हे गावातील प्राथमिक शाळा असून विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण पुरवते तसेच मांजरसुंबा गावामध्ये एक उत्तम प्रकारचे वाचनालय असून त्यामध्ये विविध पुस्तकांचा मुलांना अभ्यास करता येतो. त्याने मुलांच्या ज्ञानामध्ये भर पडते त्यामुळे मुलांची अभ्यास करण्याचे प्रोत्साहन वाढते. मांजरसुंबा हे गाव निसर्गाच्या सानिध्यात राहणाऱ्या लोकांसाठी आदर्श आहे. जिथे ग्रामीण जीवनाचा अनुभव घेता येतो तसेच आधुनिक सुविधा आणि शिक्षणाची सोय देखील उपलब्ध आहे. येथे राहणारे लोक आपली संस्कृती सह आणि परंपरा मोठ्या प्रमाणात जपतात आणि प्रत्येकाच्या गावचे स्वागत हृदयापासून करतात.

      मांजरसुंबा ग्रामपंचायत गावच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने प्रयत्नशील आहे शिक्षण आरोग्य स्वच्छता पाणीपुरवठा आणि पायाभूत सुविधा या क्षेत्रांमध्ये ग्रामपंचायतीने अनेक उपक्रम राबवले आहे. स्वच्छ गाव हरित गाव हे ध्येय साध्य करण्यासाठी गावातील प्रत्येक नागरिक सक्रिय सहभाग घेतो. ग्रामपंचायतीच्या मार्गदर्शनाखाली शासकीय योजना आणि सामाजिक कार्यक्रम प्रभावीपणे राबवले जातात ज्यामुळे गाव विकासाच्या दिशेने वाटचाल करत आहे. गावातील एकोपा संस्कृती आणि परंपरा यांचा संगम म्हणजे मांजरसुंबा येथे साजरी होणारे सण जत्रा आणि धार्मिक कार्यक्रम गावच्या एकात्मतेची प्रतीक आहेत. ग्रामस्थांच्या सहभागातून आणि नवकल्पनांच्या माध्यमातून मांजरसुंबा ग्रामपंचायत आधुनिक स्वच्छ आणि आत्मनिर्भर गाव बनवण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी कटिबद्ध आहे. मांजरसुंबा हे गाव एक सुंदर हिरवेगार आणि संस्कृत समृद्ध गाव आहे. गावच्या सभोवताली डोंगर शेत शिवार आणि निसर्ग परिसर संपन्न असल्याने हे ठिकाण ग्रामीण महाराष्ट्राचे खऱ्या अर्थाने दर्शन घडवत येथील लोक परिश्रमी नम्र आणि एकोप्याने राहणारे आहे.

      शेती हा येथील मुख्य व्यवसाय असून ऊस, मका, कांदा, ज्वारी, बाजरी, सोयाबीन, मूग, भाजीपाला ही पिके मोठ्या प्रमाणावर घेतली जातात. तसेच काही ग्रामस्थ दुग्ध व्यवसाय आणि लघु उद्योगात कार्यरत आहे. हे गाव एक समृद्ध गाव आहे. आमचा उद्देश प्रत्येक नागरिकाला उच्च दर्जाची सेवा देणे आणि गावचा सर्वांगीण विकास साधने हा आहे. मांजरसुंबा हे महाराष्ट्रातील अहिल्यानगर जिल्ह्याच्या नगर तालुक्यातील एक समृद्ध आणि आदर्श गाव आहे. मांजरसुंबा ग्रामपंचायत ही एक सक्रिय प्रगतशील नागरिकाभिमुख संस्था आहे. ग्रामपंचायतचे मुख्य उद्दिष्ट गावचा सर्वांगीण विकास साधने आणि प्रत्येक नागरिकापर्यंत शासकीय योजना पोहोचवणे हा आहे. पाणीपुरवठा स्वच्छता आरोग्य, शिक्षण, रस्ते बांधणी आणि शेती विकास यांसारख्या मूलभूत सुविधांच्या उभारणीसाठी सातत्याने प्रयत्न केले जातात. ग्रामपंचायत पारदर्शक आणि जबाबदार प्रशासन ठेवण्यावर भर देते तसेच नागरिकांच्या सहभागातून निर्णय घेतले जातात. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून ग्रामपंचायत नागरिकांना ऑनलाइन सेवा आणि माहिती सुलभ रीत्या उपलब्ध करून देते. पर्यावरण संवर्धन वृक्षारोपण आणि स्वच्छता अभियानाच्या माध्यमातून गाव हरित आणि स्वच्छ ठेवण्याचे काम केले जाते.

      महिला सक्षमीकरण आणि युवकांचे प्रगतीसाठी ग्रामपंचायतकडून अनेक उपक्रम राबवले जातात. महिलांसाठी बचत गट स्वयंरोजगार योजना आणि कौशल्य प्रशिक्षण कार्यक्रमा आयोजित केली जातात. तरी युवकांसाठी रोजगार मेळावा, कौशल्य विकास उपक्रम आणि उद्योग शेतीसाठी मार्गदर्शन दिले जाते. शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रातील प्रगतीसाठी आरोग्य शिबिरे, जनजागृती मोहिमा आणि शैक्षणिक सुविधा वाढवणार विशेष लक्ष दिले जाते. सामाजिक कार्यात नागरिकांचा सहभाग आणि शासकीय योजनांची प्रभावी अंमलबजावणी यामुळे मांजरसुंबा आज एक आदर्श आणि हरित डिजिटल गाव म्हणून ओळखले जाते. ग्रामपंचायतच्या समर्पित कर्मचाऱ्यांच्या आणि गावकऱ्यांच्या सहकार्याने मांजरसुंबा सर्वांगीण विकासाच्या दिशेने सतत प्रगती करत आहे.